भारतीय नोटा कागदाच्या नाहीत! जाणून घ्या कशापासून तयार होतात?

Aarti Badade

रोजच्या व्यवहाराचा अविभाज्य भाग

डिजिटल पेमेंट (Digital Payment) वाढलं असलं तरी, भारतीय नोटांचा वापर अजूनही आपल्या रोजच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात होतो. आपण १० ते ५०० रुपयांच्या नोटा वापरतो.

Sakal

नोट कशाची बनते?

तुम्हाला काय वाटतं? नोटा कागदाच्या असतात, कारण त्या लवकर फाटतात किंवा मळतात? पण ही खरी गोष्ट नाही! नोटा कागदापासून बनत नाहीत.

Sakal

खरी माहिती काय आहे?

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या माहितीनुसार, भारतीय नोटा १००% कॉटन (कापूस) आणि लिननच्या रेशमापासून (Linen Silk) बनवलेल्या असतात.

Sakal

कागदाऐवजी कापूस का?

नोटा कागदाऐवजी शुद्ध कापसाचा वापर करून बनवल्या जातात. याचे कारण म्हणजे कापसामुळे नोटांना टिकाऊपणा मिळतो.

sakal

कॉटनचे फायदे

कॉटन वापरल्यामुळे नोटांची ताकद (Strength) वाढते. त्यामुळे त्या लवकर फाटत नाहीत किंवा खराब होत नाहीत, तसेच त्या दीर्घकाळ सुरक्षित राहतात.

Sakal

म्हणून त्या दीर्घकाळ टिकतात

नोटांमध्ये कापूस आणि लिननचे रेशीम वापरल्याने त्या दीर्घकाळ टिकतात आणि रोजच्या वापरात येणाऱ्या वापरामुळे होणारे नुकसान कमी होते.

Sakal

पुढच्या वेळी नोट पाहताना लक्षात ठेवा!

पुढच्या वेळी तुम्ही नोटा वापराल, तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही फक्त कागद नाही, तर कापूस आणि रेशीम वापरून बनवलेले एक टिकाऊ माध्यम वापरत आहात!

Sakal

भारतात सर्वात पहिली नोट प्रेस कुठे आणि कधी सुरू झाली

India Currency Note Press

|

sakal 

येथे क्लिक करा