Aarti Badade
हनुमान चालीसातील ही ओळ केवळ भक्ती नाही, तर यशस्वी जीवनाचे 'मॅनेजमेंट सूत्र' आहे. माता जानकीने हनुमंताला ८ सिद्धी आणि ९ निधींचे वरदान दिले होते.
Success tips from Hanuman Chalisa
Sakal
'अणिमा' म्हणजे सूक्ष्म होणे आणि 'महिमा' म्हणजे विराट होणे. आयुष्यात कधी नम्र होऊन लहान व्हावे आणि कधी जबाबदारी घेण्यासाठी मोठे व्हावे, हे या सिद्धी शिकवतात.
Success tips from Hanuman Chalisa
Sakal
'गरिमा' म्हणजे जड होणे (विचारांत प्रगल्भता) आणि 'लघिमा' म्हणजे हलके होणे. संकटात स्थिर राहणे आणि कठीण कामात चपळता दाखवणे, हे यशाचे गमक आहे.
Success tips from Hanuman Chalisa
Sakal
'प्राप्ती' म्हणजे ध्येय गाठणे आणि 'प्राकाम्य' म्हणजे अढळ इच्छाशक्ती. तुमची जिद्द प्रबळ असेल, तर अशक्य गोष्टीही तुम्ही साध्य करू शकता, हा संदेश हनुमंत देतात.
Success tips from Hanuman Chalisa
Sakal
'ईशित्व' म्हणजे परिस्थितीवर नियंत्रण आणि 'वशित्व' म्हणजे प्रभाव पाडणे. उत्तम लीडर होण्यासाठी स्वतःच्या इंद्रियांवर ताबा आणि इतरांना प्रभावित करण्याची कला गरजेची आहे.
Success tips from Hanuman Chalisa
Sakal
कुबेराची नऊ रत्ने म्हणजे नवनिधी. हनुमानाची अनन्य भक्ती करणाऱ्या भक्ताला केवळ शारीरिक शक्तीच नाही, तर आर्थिक आणि आध्यात्मिक समृद्धीही प्राप्त होते.
Success tips from Hanuman Chalisa
Sakal
सर्व सिद्धी असूनही हनुमान स्वतःला 'रामदूत' म्हणवण्यात धन्यता मानत. मोठी पदे मिळाल्यावरही पाय जमिनीवर ठेवणे, हाच यशस्वी करिअरचा सर्वात मोठा मंत्र आहे.
Success tips from Hanuman Chalisa
Sakal
Mystery of Hanuman Temples
Sakal