Aarti Badade
घरी फिश फ्राय करताना मासा अनेकदा तव्याला चिकटतो किंवा उलटताना तुटतो. पण योग्य पारंपारिक पद्धत वापरली, तर मासा हॉटेलसारखा खुसखुशीत आणि सोनेरी होतो.
Secret to Perfect Fish Fry
Sakal
उत्तम फिश फ्रायसाठी नेहमी ताजा मासा वापरा. जास्त दिवस फ्रीजमध्ये राहिलेला मासा तळताना चुरगळतो. पापलेट, सुरमई किंवा रोहू यांसारखे घट्ट पोत असलेले मासे निवडा.
Secret to Perfect Fish Fry
Sakal
माशाचे तुकडे धुतल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे करणे ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. तुकडे धुतल्यावर १० मिनिटे किचन टॉवलवर ठेवा; ओलसरपणामुळेच मासा तव्याला चिकटतो.
Secret to Perfect Fish Fry
Sakal
आलं-लसूण पेस्ट, हळद, तिखट, मीठ आणि थोडा लिंबाचा रस एकत्र करून माशाला लावा. मॅरिनेशनमध्ये २ चमचे तांदळाचे पीठ किंवा रवा घातल्याने माशाला छान घट्टपणा येतो.
Secret to Perfect Fish Fry
Sakal
तवा पूर्ण तापल्याशिवाय मासा त्यावर ठेवू नका. तवा थंड असेल तर मासा चिकटून तुटतो. थोडे तेल टाकून ते गरम झाल्यावर त्यात रवा टाकून तपासा; रवा लगेच फुलला की समजा तवा तयार आहे.
Secret to Perfect Fish Fry
sakal
खूप जास्त किंवा खूप कमी तेल टाकू नका. तव्याच्या पृष्ठभागावर मासा तरंगेल इतपत तेल पुरेसे आहे. मध्यम आचेवर तळल्यास मासा बाहेरून क्रिस्पी आणि आतून रसाळ राहतो.
Secret to Perfect Fish Fry
Sakal
मासा तव्यात ठेवल्यावर तो लगेच उलटण्याचा प्रयत्न करू नका. खालची बाजू पूर्णपणे सोनेरी आणि कडक होईपर्यंत वाट पाहा. पलटण्यासाठी सपाट चमचा किंवा स्पॅच्युला वापरा.
Secret to Perfect Fish Fry
Sakal
तुमचा 50 वर्षे जुन्या पद्धतीचा खुसखुशीत फिश फ्राय तयार आहे! याला लिंबू, कांदा आणि पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा आणि जेवणाचा आनंद घ्या.
Secret to Perfect Fish Fry
Sakal
Bombil Rassa recipe Marathi
Sakal