Anuradha Vipat
सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी आणि अंकुश चौधरीचं त्रिकुट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे.
'दुनियादारी' या चित्रपटाच्या 11 वर्षांनंतर हे तिघं पुन्हा एकदा सीक्वेलच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.
या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव करणार आहेत.
‘पुन्हा दुनियादारी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. ‘दुनियादारी’तील मैत्री प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे
अकरा वर्षांची आतुरता संपत अखेर ‘पुन्हा दुनियादारी’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
‘पुन्हा दुनियादारी’त कट्टा गँग ‘त्यांना साथ देणार का हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘पुन्हा दुनियादारी’मध्ये सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांची यारी पाहायला मिळणार आहे