सकाळ डिजिटल टीम
फारसी भाषेत ‘रूह’ म्हणजे आत्मा आणि ‘अफजा’ म्हणजे वाढवणारे – म्हणजे आत्मा ताजातवाना करणारे!
१९०७ मध्ये हकीम अब्दुल मजीद यांनी रूह अफजाची निर्मिती केली आणि त्याचे नावही त्यांनीच ठेवलं.
शरीरातील उष्णता कमी करणं, डिहायड्रेशन रोखणं हे हेतू ठेवून तयार करण्यात आलं.
गुलाब, फळांचे अर्क, गवत, फुलं आणि औषधी वनस्पती यांचं मिश्रण – म्हणून चव आणि आरोग्य दोन्ही.
१०० वर्षांहून अधिक काळ लोकांनी रूह अफजाला उन्हाळ्याचा राजा मानलं आहे.
इतक्या प्रमाणात चव, औषधी गुणधर्म आणि नॉस्टॅल्जिया यांचं मिश्रण क्वचितच आढळतं.
फाळणीनंतरही रूह अफजा भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये लोकांच्या मनात घर करून आहे.
इफ्तार, लग्नं, उन्हाळ्यातील जेवण – रूह अफजा हे सगळं खास बनवतं.