सकाळ वृत्तसेवा
बहुतांश प्रगत राष्ट्रांच्या चलनांसाठी काही ना काही चिन्ह वापरले जाते. यातील बरीचशी चिन्हे जगभरात प्रसिद्ध असतात.
अमेरिकेचा डॉलर, ब्रिटनचा पाऊंड, युरोपचा युरो या चलनांची चिन्हे सर्वांनाच ठाऊक असतात.
सुरुवातीपासून भारतीय चलनासाठी कोणतेही चिन्हे ठरलेले नव्हते. मग २००९ मध्ये केंद्र सरकारने यासंदर्भात एक निर्णय घेतला.
जेव्हा कोणतेही चिन्ह नव्हते तेव्हा भारतीय रुपयासाठी Rs किंवा Re असे संक्षिप्त रुप वापरले जायचे.
रुपयासाठीही चिन्ह असले पाहिजे, असा निर्णय झाल्यावर केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर सर्वांसाठी स्पर्धा जाहीर केली.
राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेसाठी 3,331 जणांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून पाच जणांची डिझाईन्स अंतिम स्पर्धेसाठी निवडण्यात आली.
नंदिता कोरिया-मेहरोत्रा, हितेश पद्मशाली, शिबिन केके, शाहरुख जे इराणी, डी उदय कुमार