सकाळ वृत्तसेवा
आपण अनेक गावांच्या नावामागे ‘खुर्द’ आणि ‘बुद्रुक’ असे लिहिले असते. पूर्वीच्या मुसलमानी अंमलात, विशेषतः मोगल, आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाही काळात, ‘खुर्द’ आणि ‘बुद्रुक’ हे शब्द गावांसाठी वापरण्यात आले.
🔹 ‘बुजुर्ग’ – मोठा
🔹 ‘खुर्द’ – लहान
मोठ्या भागाला ‘बुद्रुक’ आणि छोट्या भागाला ‘खुर्द’ असे संबोधले जाई.
जेव्हा गाव नदी, ओढा किंवा मुख्य रस्त्याने दोन भागात विभागले जात असे, तेव्हा मोठ्या भागाला ‘बुद्रुक’ आणि लहान भागाला ‘खुर्द’ म्हटले जाई.
‘बुजुर्ग’ हा शब्द कालांतराने अपभ्रंश होऊन ‘बुद्रुक’ असा झाला, पण ‘खुर्द’ मात्र तसाच राहिला.
🔹 पाटस खुर्द आणि पाटस बुद्रुक
🔹 लोणी खुर्द आणि लोणी बुद्रुक
🔹 मांजरी खुर्द आणि मांजरी बुद्रुक
‘खुर्द’ म्हणजे लहान, आणि हेच आपण आजही ‘खुर्दा’ या शब्दात पाहतो. उदा. – खिशातल्या नाण्यांना आपण ‘खुर्दा’ म्हणतो.
आजही महाराष्ट्रात अनेक गावांच्या नावामागे ‘खुर्द’ आणि ‘बुद्रुक’ जोडलेले आढळतात.
मुस्लिम अंमलातील भाषेचा परिणाम आणि गावांची विभागणी यामुळेच आजही ‘खुर्द’ आणि ‘बुद्रुक’ असे नाव पुढे लावले जाते.