महाराष्ट्रातील या गावात लग्न कोणत्याही दिवशी असो, हळद मात्र रविवारीच लागते!

Aarti Badade

महाराष्ट्रातील एक अनोखं गाव

साधारणपणे लग्नाच्या एक-दोन दिवस आधी हळदीचा कार्यक्रम होतो. पण छत्रपती संभाजीनगरमधील पाल गावात मात्र एक वेगळीच आणि अजब परंपरा पाळली जाते.

Sunday Haldi tradition of Pal Village

|

Sakal

रविवारीच का लागते हळद?

या गावात लग्न कोणत्याही दिवशी असो, हळदीचा मुहूर्त मात्र फक्त रविवारीच असतो. फुलंब्री तालुक्यातील या गावात सुमारे ३०० वर्षांपासून ही प्रथा अखंडपणे सुरू आहे.

Sunday Haldi tradition of Pal Village

|

Sakal

हळद लावण्याची खास पद्धत

येथे हळद लावताना घरातील सर्व दिवे बंद केले जातात. बंद खोलीत गव्हाच्या कणकेचे ७ दिवे एका ताटात लावून देवीची आराधना केली जाते.

Sunday Haldi tradition of Pal Village

|

Sakal

मोजक्याच लोकांची उपस्थिती

हळद लावताना खोलीत फक्त ५ सुवासिनी महिला आणि नवरदेव किंवा नवरी असते. इतर कोणालाही या विधीच्या वेळी उपस्थित राहण्याची परवानगी नसते.

Sunday Haldi tradition of Pal Village

|

Sakal

३०० वर्षांपूर्वीची ती धक्कादायक घटना

असे म्हणतात की, ३०० वर्षांपूर्वी एका लग्नात ३ दिवस हळद लावली गेली होती. मात्र, लग्नानंतर ५ व्या दिवशी नवरदेवासह कुटुंबातील ७-८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Sunday Haldi tradition of Pal Village

|

Sakal

परंपरेचा उगम

या दुःखद घटनेमुळे गावकरी हादरून गेले. तेव्हापासून अशुभ टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी फक्त रविवारीच आणि विशिष्ट पद्धतीने हळद लावण्याचा नियम करण्यात आला.

Sunday Haldi tradition of Pal Village

|

Sakal

श्रद्धेने जपलेला वारसा

पाल गावातील जवळपास ९५% वस्ती जाधव कुटुंबाची आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा आजही या गावाची एक वेगळी ओळख निर्माण करून आहे.

Sunday Haldi tradition of Pal Village

|

Sakal

गुगलवर २०२५ मध्ये नेटकऱ्यांनी कोणत्या शब्दांचा अर्थ शोधला? हे शब्द पाहून तुम्हीही चकित व्हाल!

2025 Google Trends:

|

esakal

येथे क्लिक करा