Aarti Badade
दिवाळीच्या एक दिवस आधी नरक चतुर्दशीला (Choti Diwali) एक खास विधी केला जातो. पहाटे अभ्यंगस्नानापूर्वी कारिट फळ फोडण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आजही पाळली जाते.
Karit Phala Ritual
Sakal
हे फळ फोडणे म्हणजे नरकासुर राक्षसाचा पराभव आणि त्याचा वध झाल्याचे प्रतीक आहे.भगवान श्रीकृष्णाच्या विजयाचे स्मरण यानिमित्ताने केले जाते.
Sakal
कारिट फळ हे नरकासुर राक्षसाचे प्रतीक मानले जाते. हे फोडणे म्हणजे वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय होय.
Sakal
नरक चतुर्दशीच्या पहाटे सूर्योदयापूर्वी उठून हा विधी केला जातो. अभ्यंगस्नान (Mangal Snan) करण्यापूर्वी कारिट फळ फोडणे आवश्यक मानले जाते.
Sakal
फळ जमिनीवर ठेवून डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडले जाते. हे फळ फोडल्याने नरकासुर मारला गेला असे मानले जाते.
Sakal
ही प्रथा शक्यतो घराबाहेर किंवा तुळशी वृंदावनाजवळ केली जाते.आजही महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये आणि खासकरून कोकण प्रदेशात ही परंपरा पाळली जाते.
Sakal
ही परंपरा आपल्याला सत्य आणि धर्माच्या विजयाचे स्मरण करून देते. नरक चतुर्दशीला हा विधी श्रद्धेने पाळल्यास अकाली मृत्यूचा धोका टळतो, असे मानले जाते.
Sakal