सकाळ डिजिटल टीम
भारत POK काश्मीरला आपला अविभाज्य भाग मानतो.
1947 पूर्वी जम्मू-काश्मीर हे महाराजा हरिसिंह यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र राजेशाही संस्थान होते.
भारत आणि पाकिस्तानच्या विभाजनानंतर, महाराजा हरिसिंह यांनी भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्यासंबंधी करारावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे जम्मू-काश्मीर अधिकृतपणे भारताचा भाग बनला.
याच दरम्यान, पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या काही भागांवर दावा करत 1947 मध्ये सैन्य पाठवून आक्रमण केले.
या आक्रमणामुळे जम्मू-काश्मीरचा जो भाग पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली गेला, तो ‘पाक-अधिकृत काश्मीर’ (PoK) म्हणून ओळखला जातो आणि तेव्हापासून हा प्रदेश भारत आणि पाकिस्तान यांच्यात वादाचा मुद्दा आहे.
पाक-अधिकृत काश्मीरचे प्रशासकीयदृष्ट्या दोन भाग आहेत. आझाद काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तान. हे दोन्ही भाग पाकिस्तानच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहेत.
POK काश्मीरचा मुद्दा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अनेक युद्धांचे एक महत्त्वाचे कारण ठरला आहे.
आजच्या स्थितीत POK काश्मीर पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली असला तरी, भारत आजही या भागावर आपला हक्क कायम ठेवतो.