Aarti Badade
जाहिरातींना बळी पडून फेअरनेस क्रीम वापरताय? जरा थांबा! हे तुमच्या त्वचेसाठी धोकादायक ठरू शकते.
बहुतेक क्रीममध्ये मेलॅनिन कमी करणारी ब्लीचिंग केमिकल्स असतात. ती त्वचेचा रंग फक्त तात्पुरता बदलतात.
फेअरनेस क्रीमचा सतत वापर केल्यास त्वचा सेन्सिटीव्ह होते, कोरडेपणा वाढतो आणि सूर्यप्रकाशात त्वचा जळते.
हे क्रीम त्वचेला 'सवय' लावते. एक दिवस वापर न केल्यास त्वचा निस्तेज दिसते.
नाही! कोणतेही क्रीम त्वचेचा नैसर्गिक रंग कायमस्वरूपी बदलू शकत नाही.
सगळ्यात पहिला उपाय म्हणजे हे क्रीम वापरणं थांबवा आणि त्वचेला नैसर्गिकपणे श्वास घेऊ द्या.
एजिंग आणि ड्राय स्किनसाठी नैसर्गिक घटकांपासून बनलेले हर्बल मॉइश्चरायझर वापरा.
रात्री झोपण्याआधी क्लिंझिंग (Cleansing), टोनिंग (Toning) आणि मॉइश्चरायझिंग (Moisturizing) हे रूटीन करा.
तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य नैसर्गिक प्रॉडक्ट कोणते, हे जाणून घेण्यासाठी ब्युटी थेरपिस्टचा सल्ला घ्या आणि तेच वापरा.
गौरवर्ण नव्हे, तर निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण त्वचाच खरं सौंदर्य असते!