Anuradha Vipat
अभिनेत्री मलायका अरोरा सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
मलायका एका ‘मिस्ट्री मॅन’सोबत दिसली होती. ते दोघं मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर हातात हात घालून चालताना दिसले होते.
आता मलायका आणि त्या मिस्ट्री मॅनच्या अफेअरच्या चर्चां मागचं सत्य आता समोर आलं आहे.
माहितीनुसार, मलायकाच्या जवळच्या व्यक्तीने तिच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला आहे.
मलायका त्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी खोटी असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे . त्याचसोबत ती सिंगल असल्याचंही त्याने म्हटलं आहे
आता मलायका सिंगल आणि खुश आहे. तिच्यासोबत दिसणारा मिस्ट्री मॅन हा राहुल विजय असून तो तिचा मुलगा अरहानचा स्टायलिस्ट आहे.
तसेच या दोघांच्या अफेअरच्या चर्चा अत्यंत निराधार आहेत असं त्या व्यक्तीने सांगितलं आहे.