Aarti Badade
मॅकाडेमिया नट्समध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे हृदयासाठी लाभदायक आहेत. हे फॅट्स कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवून हृदयरोगाचा धोका कमी करतात.
दररोज मॅकाडेमिया नट्स खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदूचे कार्य चांगले राहते.
मॅकाडेमिया नट्समध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, पोटॅशियम व कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. हे तणाव कमी करण्यात मदत करतात.
मधुमेह असणाऱ्यांसाठी मॅकाडेमिया नट्स फायदेशीर ठरतात. मर्यादित प्रमाणात घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
या नट्समध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे हाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे.
मॅकाडेमिया नट्समध्ये फायबर भरपूर असते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही व वजन कमी करण्यास मदत होते.
या नट्समध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते आणि अशक्तपणा दूर होतो.
सर्व नट्सप्रमाणेच मॅकाडेमिया नट्स देखील मर्यादित प्रमाणातच सेवन करावेत, कारण त्यात फॅट्स व कॅलरी जास्त असतात.