तुकोबांच्या मुलाने हातात शस्त्र घेऊन मुघलांना पळवून लावले होते

सकाळ वृत्तसेवा

तुकोबांचे सुपुत्र – संत नारायण महाराज

इ.स. १६८५ मध्ये संत तुकाराम महाराजांचे धाकटे पुत्र नारायण महाराजांनी पालखी सोहळ्याची परंपरा सुरू केली.

sant narayan maharaj dehu | sakal

पालखी परंपरेचा शुभारंभ

विठुरायाच्या भक्तीचा प्रचार व वारकरी संप्रदाय दृढ करण्यासाठी त्यांनी पालखी सोहळा सुरू केला – जो आजही अविरत सुरू आहे.

sant narayan maharaj dehu | sakal

औरंगजेबाच्या काळात अराजकता

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मुघल अराजकता पसरली होती. यात्रेकरूंना उपद्रव सहन करावा लागत होता.

sant narayan maharaj dehu | sakal

राजाराम महाराजांना पाठवलेलं पत्र

नारायण महाराजांनी छत्रपती राजाराम महाराजांना पत्र लिहून यात्रेकरूंच्या सुरक्षेची मागणी केली होती.

sant narayan maharaj dehu | sakal

यात्रेकरूंना सुरक्षिततेची हमी

राजाराम महाराजांनी देखील सकारात्मक उत्तर देऊन यात्रेकरूंना सुरक्षिततेची हमी दिली होती.

sant narayan maharaj dehu | sakal

तरीही त्रास थांबला नाही

मुघल सैन्याचा त्रास वाढतच गेला. यात्रेकरूंच्या मार्गात अडथळे आले.

sant narayan maharaj dehu | sakal

नारायण महाराजांचा प्रतिकार!

तपस्वी संत असूनही नारायण महाराजांनी शस्त्र उचलले आणि सांगुर्डी येथे मुघल सैन्याचा पराभव केला.

sant narayan maharaj dehu | sakal

एक संत, एक योद्धा!

संत असूनही धर्म व भक्तांच्या रक्षणासाठी त्यांनी शस्त्र हाती घेतले.

sant narayan maharaj dehu | sakal

आमिर खानच्या पहिल्या सिनेमाचे फायनान्सर होते श्रीराम लागू

Aamir Khan | esakal
येथे क्लिक करा