हापूसपेक्षाही महाग, किंमत ऐकून व्हाल थक्क! हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा

सकाळ डिजिटल टीम

"एग ऑफ द सन"

ताईयो नो तामागो म्हणजे जपानी भाषेत "एग ऑफ द सन". हा आंबा केवळ नावानेच खास नाही, तर त्याची चव, रंग, वास आणि किंमतसुद्धा अप्रतिम असते.

Egg of the Sun | Sakal

जपानमधील उत्पादन

हा आंबा 'मियाझाकी प्रांतात' पिकवला जातो. त्यासाठी विशेष तापमान, हवामान आणि काळजी घेतली जाते. प्रत्येक फळ झाडावरच एका जाळीमध्ये जपून वाढवलं जातं.

Grown Exclusively in Japan | Sakal

झाडावरून कधीच तोडत नाहीत

हा आंबा झाडावर पिकतो, आणि जाळीतच पडतो. त्यामुळे त्याचा आकार सुंदर, गुळगुळीत आणि अप्रतिम राहतो.

Never Plucked from the Tree | Sakal

स्वाद

या आंब्याला अननस आणि नारळासारखा मिश्रित गोडवा असतो, जो इतर कोणत्याही आंब्यात अनुभवायला मिळत नाही.

A Unique Flavor | Sakal

दुकानात नाही, थेट लिलावातच!

हा आंबा दुकानात विक्रीसाठी नसतो. त्याचा लिलाव होतो आणि सर्वाधिक बोली लावणाऱ्यालाच तो मिळतो.

Only at Auction! | Sakal

किंमत ऐकून थक्क व्हाल!

2017 साली या आंब्याच्या दोन फळांची किंमत तब्बल ₹2.72 लाख होती! आणि आजही किंमतीत वाढच झाली आहे.

Price | Sakal

गिफ्टमध्ये "लकी चार्म"

जपानी लोक सण-समारंभात हा आंबा भेट देतात. असं मानलं जातं की याची भेट मिळणं म्हणजे सूर्याइतकं तेज तुमच्यावर आहे, त्यामुळे याला "एग ऑफ द सन" म्हणतात.

A “Lucky Charm” Gift | Sakal

जी आय टॅग नाही, पण स्टेटस

हापूसला जी आय टॅग मिळाला असला तरी 'ताईयो नो तामागो' हा आंबा स्टेटस सिंबल मानला जातो.

No GI Tag | Sakal

विषारी मानला गेलेला 'टोमॅटो' भारतात कसा आला?

How did the tomato considered poisonous, come to India | Sakal
येथे क्लिक करा