सकाळ वृत्तसेवा
साबण ही रोजच्या वापराची गोष्ट आहे. हात धुणं, आंघोळ करणं, स्वच्छ राहणं, पण तुला माहीत आहे का? जगात एक असा साबण आहे, ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे.
Most Expensive Soap
Sakal
हा शाही साबण लेबनॉनमधील Badr Hassan & Sons या प्रसिद्ध कंपनीने तयार केला आहे. ही कंपनी १५व्या शतकापासून हाताने साबण बनवते. म्हणजेच पारंपरिक कलेचा वापर करते.
Most Expensive Soap
Sakal
हा साबण मशिनने नव्हे तर पूर्णपणे हँडमेड असतो. यात प्राचीन तंत्र, नैसर्गिक सुगंध, आणि त्वचेसाठी उपयुक्त तेलांचा वापर होतो.
Most Expensive Soap
Sakal
हो, खरंच! या साबणात सोनेरी पावडर आणि हिरे बसवले जातात.
Most Expensive Soap
Sakal
या शाही साबणाची किंमत आहे तब्बल २,८०० डॉलर (सुमारे ₹२.३ लाख) म्हणजे एका साबणावर लोक लाखो रुपये खर्च करतात.
Most Expensive Soap
Sakal
हा साबण साध्या दुकानात नाही मिळत. तो फक्त युएईतील काही खास बुटिक्समध्ये विकला जातो. आणि तो फक्त निवडक राजघराण्यांसाठी व व्हीआयपी लोकांसाठीच बनवला जातो.
Most Expensive Soap
Sakal
पूर्वी हा साबण चीजच्या तुकड्यासारखा दिसायचा, पण आता त्यावर २४ कॅरेट सोन्याचा लेप लावला जातो. त्यामुळे तो दिसायला अधिक सुंदर आणि आकर्षक आहे.
Most Expensive Soap
Sakal
हा साबण फक्त लक्झरी नाही तर लेबनॉनच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे. पारंपरिक पद्धती आणि आधुनिक कलेचे सुंदर मिश्रण या उत्पादनात दिसतं.
Most Expensive Soap
Sakal
Smriti Mandhana
Sakal