Pranali Kodre
महिला वर्ल्ड कप २०२५ मध्ये १२ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्सने पराभूत केले.
Smriti Mandhana
Sakal
पण, असे असले तरी या सामन्यात स्मृती मानधनाने वैयक्तिक मोठा विक्रम केला.
Smriti Mandhana
Sakal
तिने ६६ चेंडूत ८० धावांची खेळी करताना वनडे कारकिर्दीत ५००० धावा पूर्ण केल्या. तिने ११२ डावात या धावा केल्या.
Smriti Mandhana
Sakal
त्यामुळे मानधना सर्वात कमी डावात ५००० वनडे धावा करणारी महिला खेळाडू तर ठरलीच, पण तिने भारतासाठीही (महिला आणि पुरुष मिळून) सर्वात जलद ५००० वनडे धावा करण्याचा विक्रम केला.
Smriti Mandhana
Sakal
मानधनाने विराटला मागे टाकले आहे. यापूर्वी भारताकडून सर्वात कमी डावात ५००० वनडे धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर होता. त्याने ११४ डावात ५००० धावा केल्या होत्या.
Virat Kohli
Sakal
तिसऱ्या क्रमांकावर आता शिखर धवन आहे. त्याने ११८ धावात ५००० वनडे धावा केल्या होत्या.
Shikhar Dhawan
Sakal
चौथ्या क्रमांकावर सौरव गांगुली असून त्याने १२६ डावात ५००० वनडे धावांचा टप्पा पार केला होता.
Sourav Ganguly
Sakal
पाचव्या क्रमांकावर एमएस धोनी आणि गौतम गंभीर संयुक्तरित्या असून त्यांनी प्रत्येकी १३५ डावात ५००० वनडे धावा केल्या होत्या.
MS Dhoni - Gautam Gambhir
Sakal
सहाव्या क्रमांकवर सचिन तेंडुलकर आहे. त्याने १३८ डावात ५००० वनडे धावांचा टप्पा पार केला होता.
Sachin Tendulkar
Sakal
सातव्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने ५००० वनडे धावा पूर्ण करण्यासाठी १४२ डाव खेळले.
Rohit Sharma
Sakal
आठव्या क्रमांकावर मिताली राज असून तिने १४४ डावात ५००० वनडे धावा केल्या होत्या.
Mithali Raj
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Sachin Tendulkar Wish Daughter Sara