Sandeep Shirguppe
अंजीर खाण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच त्याची योग्य वेळ देखील असते. जाणून घ्या अंजीर कधी आणि कसे खावेत?
अंजीरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नीज, फायबर, ब 6 जीवनसत्व, हे घटक भरपूर प्रमाणात असतात.
अंजीरचे सेवन केल्याने व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट हे घटक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
रक्ताची वाढ करण्याचे काम अंजीर करते. रक्तदाब, बद्दकोष्ठतेवरही आराम मिळतो.
अंजीर शरीरात चांगल्या बॅक्टेरिया ठेवण्यास मदत करतात.
नैसर्गिक गोड आणि फॅट फ्री म्हणून अंजीर फळाची ओळख आहे.
अंजीरचा उपयोग हा पोट साफ करण्यासाठी आणि पचनशक्ती चांगली करण्यासाठी केला जातो.
ह्रदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी अॅसिड असते.