Sandeep Shirguppe
बाजारात सहज उपलब्ध असणाऱ्या बीटचा रस पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
बीटमध्ये नायट्रेट्स भरपूर असतात, ज्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि रक्तदाब कमी होतो.
बीटचा रस 'खराब' कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म बीटमध्ये असतात, याने शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत होते.
बीटमध्ये फायबर असते, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.
बीटालेन नावाचे संयुग बीटमध्ये असते, जे यकृताचे संरक्षण करण्यास मदत करते.
बीटचा रस प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.
बीटमध्ये लोह आणि फोलेट असते, जे लाल रक्तपेशींच्या उत्पादनासाठी आवश्यक असतात.