Sandeep Shirguppe
कच्चा कांदा (Onion) कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे, जो हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
कॅल्शियम ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यास देखील कच्चा कांद्याचा उपयोग होतो.
कच्च्या कांद्यामध्ये ॲलिल प्रोपिल डायसल्फाइड नावाचे कंपाऊंड असते, याने मधुमेह(Blood Sugar) नियंत्रणात राहू शकतो.
कच्च्या कांद्यातील अँटीऑक्सिडंट्स कर्करोग आणि हृदयरोग कमी करण्यास देखील मदत करू शकतात.
व्हिटॅमिन सीचे प्रमाण कच्च्या कांद्यात असते यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
कच्चा कांदा खाल्ल्यास सर्दी, फ्लू आणि श्वसनाच्या इतर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
कांद्यामध्ये क्वेर्सेटिन नावाचे संयुग असते, जे ऍलर्जी आणि जळजळ कमी करण्यास मदत करते.
कांदा नैसर्गिकरित्या थंड असतो, त्यामुळे उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते.