Sandeep Shirguppe
सूर्यफूल बियाणे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हा अँटिऑक्सिडंट्सचा एक उत्कृष्ट स्रोत आहेत.
सूर्यफूल बियांमध्ये असलेले पोषक रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
मधुमेहाचा आजार टाळण्यासाठी सूर्यफूल बियाणे खाल्ले पाहिजे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सूर्यफूल बियाणे शरीराला संसर्गापासून वाचवतात.
सूर्यफूल बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पचनास मदत करतात.
व्हिटॅमिन ई ची मात्रा भरपूर प्रमाणात असल्याने सूर्यफूल तेल त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
सूर्यफूल बिया एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारण्यास उपयुक्त ठरतात.
नैराश्य कमी करण्यासाठी सूर्यफूल बिया रोज एक चमच्या खाव्यात.