'या' 3 पेयांमुळे दिसाल 10 वर्षांनी वयस्कर

सकाळ वृत्तसेवा

रोजच्या सवयी

तरुण दिसणं कोणाला नको असतं? पण तुमच्या रोजच्या सवयी तुमचं सौंदर्य कमी करु शकतात. काही पेये अशी आहेत, जी तुमच्या त्वचेचं नुकसान करून तुमचं वय वाढल्यासारखं दाखवू शकतात.

drinks that age you | Sakal

कोरडी त्वचा

त्वचेवर लवकर डाग आणि सूज येण्यामागे तुमचं पाणी पिण्याचं वेळापत्रकही जबाबदार असू शकतं. डाएट आणि हायड्रेशन याकडे दुर्लक्ष केल्यास वयाच्या आधीच त्वचा खराब दिसते.

drinks that age you | Sakal

कॉफी

कॉफी पिणं अनेकांचं रुटीन आहे. पण जास्त प्रमाणात कॅफीन घेतल्याने शरीर डिहायड्रेट होतं. यामुळे त्वचेची कोमलता आणि लवचिकता कमी होते. चेहरा डल, थकलेला आणि वयस्कर दिसू लागतो.

drinks that age you | Sakal

अतिप्रमाणात कॉफी पिणं

कॉफी डाय्युरेटिक असल्याने ती शरीरातून पाणी बाहेर टाकते. अतिप्रमाणात कॉफी पिणं सौंदर्याला घातक ठरू शकतं.

drinks that age you | Sakal

दारु

दारु नियमित पिणं खूप घातक आहे. ती शरीराचं पाणी कमी करते आणि स्किन डल, कोरडी बनते. कालांतराने त्वचा सुजते आणि तेज हरवते.

drinks that age you | Sakal

अती गोड पेये

कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, जास्त साखर असलेले जूस – हे सर्व त्वचेच्या आतल्या पेशींना कमजोर करतात. शरीरात ग्लायकेशनची प्रक्रिया सुरू होते आणि त्वचेतला लवचिकपणा कमी होतो.

drinks that age you | Sakal

चेहऱ्यावर रेषा पडतात

साखरेचे रेणू कोलेजनशी जुळतात आणि त्वचेला सैल करतात. त्यामुळे चेहऱ्यावर रेषा पडतात, झुरळ्या दिसतात आणि तरुणपण लवकर हरवतं.

drinks that age you | Sakal

तरुणपण टिकवायचं आहे?

या शरीरावर परिणाम करणाऱ्या ड्रिंक्सपासून दूर राहा. पाणी, नैसर्गिक रस, आणि हेल्दी लाइफस्टाइल तुमच्या सौंदर्याचं खरं गुपित आहे.

drinks that age you | Sakal

वजन वाढवण्यासाठी ही फूड कॉम्बिनेशन्स नक्की ट्राय करा!

food | Sakal
येथे क्लिक करा