Saisimran Ghashi
पावसाळ्याच्या दिवसांत लहान मुलांच्या पचनतंत्रावर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे काही विशिष्ट पदार्थ पावसाळ्यात टाळावेत, विशेषतः लहान मुलांसाठी.
रस्त्यावर मिळणारे किंवा फार वेळ ठेवलेले तळलेले पदार्थ बुरशीग्रस्त किंवा दूषित झालेले असू शकतात.
उघड्यावर आधीच कापलेली ठेवलेली फळे देऊ नका. त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका वाढतो.
पालक, कोथिंबीर, मेथी पावसात भिजल्यामुळे या भाज्यांमध्ये बुरशी वाढू शकते.
पावसाळ्यात हवामान ओलसर असल्यामुळे दूध लवकर खराब होते. कच्चे दूध, थंड पदार्थ टाळा
पावसाळ्यात शिळे अन्न देणे टाळावे. शिळ्या अन्नामुळे फूड पॉइजनिंगचा धोका वाढतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.