Aarti Badade
या ५ प्रकारच्या लोकांना कधीच वजन कमी करता येत नाही! तुम्हीही या यादीत आहात का?
पोट भरले तरी सतत खाण्याची सवय? अन्नप्रेमी लोक निरोगी-अस्वास्थ्यकर असा फरक न करता खात राहतात, ज्यामुळे वजन कमी करणे अशक्य होते.
डाएट करता पण व्यायाम नाही? फक्त आहार बदलून उपयोग होत नाही. व्यायाम केल्याशिवाय चयापचय वाढत नाही आणि चरबी कमी होत नाही.
तणावात आलात की खायला लागता का? भावनिक ताणामुळे बरेच जण जास्त आणि जंक फूड खातात. यामुळे वजन वाढते आणि झोपही बिघडते.
शरीर स्वतःच वजन वाढवतंय? शरीर एक विशिष्ट वजन टिकवून ठेवण्यासाठी भूक वाढवतं आणि चयापचय कमी करतं, ज्यामुळे वजन कमी होत नाही.
नवीन डायट दर आठवड्याला? वारंवार आहार बदलणे किंवा पाळण्यात सातत्य नसल्याने शरीराला स्थिरता मिळत नाही, आणि वजन घटत नाही.
तुम्ही या प्रकारांमध्ये कुठे बसता? आपल्या सवयींमध्ये सुधारणा केल्यास वजन कमी करणे शक्य आहे – गरज आहे फक्त सातत्याची आणि शिस्तबद्धतेची.