Anushka Tapshalkar
सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची सवय लागली आहे. पण काही गोष्टी खास ठेवणं तुमच्या सन्मान आणि प्रतिष्ठेसाठी गरजेचं आहे. जाणून घ्या अशा १० गोष्टी ज्या तुम्ही गोपनीय ठेवल्या पाहिजेत.
खूप शेअर केल्याने लोक तुमच्यावर अनावश्यक टीका करू शकतात. थोडासा गूढपणा ठेवणं चांगलं असतं.
पैशाबद्दल बोलल्याने मत्सर किंवा ताण निर्माण होऊ शकतो.
चुका शिकण्यासाठी असतात; त्या सतत मांडल्याने तुमची प्रतिमा खराब होऊ शकते.
घरगुती किंवा वैयक्तिक वाद खास ठेवावेत, ते सार्वजनिक केल्याने नकारात्मक प्रतिमा तयार होते.
तुमच्या राजकीय, धार्मिक किंवा वैयक्तिक विचारांचा आदर करा आणि गरज असेल तेव्हाच शेअर करा.
आरोग्यविषयक गोष्टी फक्त जवळच्या लोकांशी शेअर करा.
गुप्तपणे मेहनत करा; वेळ येईल तेव्हा यश स्वतः झळकेल.
दानधर्माबद्दल सर्वत्र सांगितल्यास खरी दानशूरता गुप्त राहत नाही तसेच प्रसिद्धीसाठी दान केल्यास हेतूवर प्रश्नचिन्ह लागते.
नातेसंबंधातील खाजगी बाबी शेअर केल्याने अफवा आणि गैरसमज वाढू शकतात. त्यामुळएया गोष्टी गुप्त ठेवणे कधीही चांगले.
कौटुंबिक गोष्टी सार्वजनिक केल्याने नाते बिघडू शकते. त्यामुळे या गोष्टी जास्तीत जास्त गुप्त ठेवा.