दिसायला काटेरी पण करेल पचनाच्या समस्या दूर ! जाणून घ्या अननसाचे फायदे

Monika Lonkar –Kumbhar

निरोगी जीवनशैली

निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे, फायदेशीर आहे. संतुलित आहारामध्ये अनेक खाद्यपदार्थांचा समावेश असतो. 

Benefits of Pineapple

या खाद्यपदार्थांमध्ये ताज्या फळांचा ही समावेश आहे. या ताज्या फळांमध्ये अनेक प्रकारची फळे समविष्ट आहेत. 

Benefits of Pineapple

अननस

या फळांमध्ये अननस या उष्णकटिबंधीय फळाचा समावेश आहे. अननस हे फळ बाहेरून दिसायला काटेरी दिसते. मात्र, चवीला हे फळ आतून गोड-आंबट लागते. त्यामुळे, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हे फळ खायला आवडते.

Benefits of Pineapple

अननसामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमीन बी-६, मॅंगनीज, कॉपर, फॉलेट आणि विविध प्रकारचे फायबर्स आढळून येतात. या पोषकघटकांमुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आपण अननसाचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

Benefits of Pineapple

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

अननसामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. हे व्हिटॅमीन सी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. ज्यामुळे, विविध प्रकारच्या संसर्गांशी लढण्यासाठी आपल्या शरीराला पुरेशी ताकद मिळते.

Benefits of Pineapple

पचनक्षमता सुरळीत राहते

अननसामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्सचा समावेश आढळून येतो. हे फायबर्स शरीरातील पचनक्षमता सुरळीत ठेवण्याचे काम करतात. या फायबर्समुळे अन्नाचे पचन योग्यरित्या होण्यास मदत होते. यासोबतच अननसाचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या जसे की, गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या दूर होण्यास मदत होते. 

Benefits of Pineapple

हृदयासाठी फायदेशीर

अननसामध्ये भरपूर प्रमाणात आढळून येणारे फायबर्स आणि व्हिटॅमिन सी आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. अननसाचे सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. यासोबतच उच्च रक्तदाब यांसारखी समस्या दूर होऊ शकते. हृदयासाठी फायदेशीर असणाऱ्या अननसाचा तुमच्या आहारात जरूर समावेश करा.

Benefits of Pineapple

त्वचेसाठी लाभदायी

अननसामध्ये आढळून येणारे व्हिटॅमीन सी आणि इतर पोषकघटक त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. त्यामुळे, त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी जसे की, काळे डाग, पिंपल्सच्या समस्या दूर करण्यासाठी अननस उपयुक्त आहे. अननसाचे सेवन केल्याने त्वचेवर चमक येण्यास मदत होते.

Benefits of Pineapple

महाराष्ट्रातील 'या' किल्ल्यांनी स्वराज्याच्या स्थापनेत दिले मोलाचे योगदान..!

Shiv Jayanti 2024 | esakal
येथे क्लिक करा.