मार्चमध्ये मित्रांसोबत फिरायला जायचंय? मग, 'या' बजेट फ्रेंडली ठिकाणांना नक्की द्या भेट

Monika Lonkar –Kumbhar

मार्च

मार्च हा वर्षाचा असा महिना असतो की, ज्या महिन्यात उन्हाळ्याला सुरूवात होते. या महिन्यात देशातील अनेक भागांमध्ये सौम्य उष्णता जाणवू लागते. अनेक जण या दिवसांमध्ये फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करतात.

Travel Diaries

आता अवघ्या काही दिवसांवर मार्च महिना येऊन ठेपला आहे. जर तुम्ही या मार्च महिन्यात तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा पार्टनरसोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर देशातील काही सुंदर ठिकाणांना तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

Travel Diaries

हंपी

मार्चमध्ये तुम्ही तुमच्या मित्र-मंडळींसोबत, पार्टनरसोबत किंवा कुटुंबासोबत दक्षिण भारतात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हंपी त्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश असलेले हंपी हे ठिकाण फिरण्यासाठी एकदम परफेक्ट आहे.

Travel Diaries

येथील डोंगर आणि दऱ्यांमध्ये वसलेले हंपी तुमचे लक्ष वेधून घेते. हंपीमध्ये गेल्यावर तुम्ही विरूपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर, क्विन्स बाथ, मातंग हिल्स आणि लोटस पॅलेस इत्यादी अनेक ठिकाणे पाहू शकता.

Travel Diaries

गोवा

गोवा हे भारतातील असे राज्य आहे, जे तेथील पर्यटनासाठी जास्त प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनारे आणि निसर्ग तुम्हाला भुरळ घालतो. या ठिकाणी दरवर्षी देश-विदेशातील अनेक पर्यटक भेट देतात.

Travel Diaries

समुद्रकिनाऱ्यांसोबत गोव्यामधील मंदिरे, चर्च आणि समुद्री किल्ल्यांना ही तुम्ही भेट देऊ शकता. यासोबतच दूधसागर धबधबा, अंजुना बीच, वागेतोर बीच आणि बॅसिलिका ऑफ बॉम जीझस इत्यादी उत्तम ठिकाणे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता.

Travel Diaries

ऋषिकेश

'योगनगरी' म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले हे ठिकाण म्हणजे ऋषिकेश होय. उत्तराखंड राज्यात स्थित असलेले ऋषिकेश हे एक सुंदर हिलस्टेशन आहे. येथील उंच पर्वत, तलाव-धबधबे, घनदाट जंगले आणि गंगा नदी ऋषिकेशच्या सौंदर्यात आणखी भर घालतात.

Travel Diaries

बहिणीचे लग्न असो किंवा मैत्रिणीचा साखरपुडा, 'या' डिझायनर नेट साड्या आहेत बेस्ट ऑप्शन

Designer Net Sarees | esakal