हाडांच्या बळकटीसाठी तुमच्या आहारात कॅल्शिअम युक्त फळांचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

शारिरीक हालचाल

निरोगी राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

संतुलित आहार

संतुलित आहारामध्ये विविध पोषकघटकांनी युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा, फळांचा समावेश असतो.

कॅल्शिअम

कॅल्शिअमने युक्त असलेल्या खाद्यपदार्थांमुळे शरीराची वाढ चांगली होते. चला तर मग जाणून घेऊयात कॅल्शिअने युक्त असलेल्या फळांबद्दल.

संत्रा

संत्र्यामध्ये कॅल्शिअमचे भरपूर प्रमाण आढळते. हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

अंजीर

सुकवलेल्या अंजीरला कॅल्शिअमचा प्रमुख स्त्रोत मानला जाते. याचे सेवन केल्याने हाडे आणि दात मजबूत राहतात.

किवी

किवी या फळामध्ये कॅल्शिअमचे विपुल प्रमाण आढळते. हे फळ आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिनचे भरपूर प्रमाण असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी स्ट्रॉबेरी उपयुक्त आहे.

लांब अन् दाट केसांसाठी आहारात समाविष्ट करा 'हे' पदार्थ

Hair Care tips | esakal