Anushka Tapshalkar
बेदाण्याचे पाणी यकृतातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते आणि त्याचे काम सुधारते. पित्ताचा समस्या सुधारून पचन प्रक्रिया सुधारते आणि पचनसंस्था स्वच्छ करते.
बेदाणे भरपूर फायबरने समृद्ध असतात. ते आतड्यांच्या हालचालींना चालना देतात आणि बद्धकोष्ठता रोखून पचन सुधारतात.
बेदाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे सोडियम पातळी संतुलित करून रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.
बेदाण्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी- कॉम्प्लेक्स सारखं एअवश्यक जीवनसत्त्वे असतात. तसेच फिनॉलिक सारखे अँटिऑक्सिडंट्सही असतात, जे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करतात.
बेदाण्यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि मजबूतीसाठी आवश्यक असतात.
बेदाणे भूक कमी करून जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करतात, ज्यामुळे वजन कमी करणे सोयीस्कर होते. तसेच शरीरात अनावश्यक चरबी साठण्यास प्रतिबंध करते.
बेदाण्यांमध्ये नैसर्गिक साखरेच्या प्रमाणासह कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत होते.
बेदाणे लोहाचा एक उत्तम स्रोत आहेत. हे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी महत्तवाचे आहेत.
बेदाण्यामधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात.