लोहाची कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत मेथीचे दाणे

Monika Lonkar –Kumbhar

मेथी

हिवाळ्यात अनेक हिरव्या पालेभाज्या मार्केटमध्ये येतात. या हिरव्या पालेभाज्यांमध्ये मेथीचा ही समावेश आहे. मेथीमध्ये व्हिटॅमिन सी आणि विविध प्रकारच्या पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. 

Fenugreek Seeds Benefits

मेथीचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.

Fenugreek Seeds Benefits

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. मेथीच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, फायबर्स, व्हिटॅमिन सी, लोह आणि इतर पौष्टिक घटकांचा समावेश असतो. जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. आज आपण मेथीच्या दाण्यांचे आरोग्याला होणारे फायदे कोणते? त्याबद्दल जाणून घेऊयात.

Fenugreek Seeds Benefits

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते

मेथीच्या दाण्यांचा आहारात समावेश करणे, हे मधुमेहाच्या रूग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये शरीरात विरघळणाऱ्या फायबर्सचा समावेश असतो. जे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Fenugreek Seeds Benefits

लोहाची कमतरता दूर होते

मेथीच्या दाण्यांमध्ये लोहाचे भरपूर प्रमाण आढळून येते. मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. यासोबतच मेथीच्या दाण्यांमध्ये लोहाचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.

Fenugreek Seeds Benefits

लोहामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. खास करून गर्भधारणे दरम्यान आणि स्तनपाण करण्याच्या काळात लोहाची कमतरता असलेल्या महिलांसाठी मेथीचे दाणे उपयुक्त आहेत.

Fenugreek Seeds Benefits

सांधेदुखीपासून आराम मिळेल

मेथीच्या दाण्यांमध्ये लोह, फायबर्स, फॉस्फरस आणि कॅल्शिअमचे भरपूर प्रमाण आढळून येते. या सर्व पोषकघटकांमुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते. यासोबतच मेथीच्या दाण्यांमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्मांचा समावेश असतो. हे गुणधर्म आपल्या शरीरातील सांध्यांमधील सूज कमी करण्यास मदत करतात.

Fenugreek Seeds Benefits

'व्हॅलेंटाईन्स डे' च्या निमित्ताने जोडीदारासोबत 'या' बजेट फ्रेंडली ठिकाणांना नक्की द्या भेट

Valentines day 2024 | esakal