Anushka Tapshalkar
भारतातील आयटी क्षेत्र हे जगातील सर्वात मोठ्या आयटी क्षेत्रांपैकी एक आहे.
भारतातील आयटी क्षेत्र यशस्वी होण्यासाठी इथल्या प्रत्येक आयटी उद्योगातील प्रमुख नेते कारणीभूत आहे.
चला तर मग जाणून घेऊया २०२४ मध्ये आघाडीवर असणाऱ्या व सर्वात जास्त पगार घेणाऱ्या या आयटी सीईओंबद्दल.
2023 मध्ये ते सीईओ बनलेले Cognizant कंपनीचे सीईओ रवी कुमार सिंगसेट्टी यांना गेल्या वर्षी $22.56 दशलक्ष (अंदाजे 186 कोटी) नुकसानभरपाई मिळाली.ज्यामध्ये मुख्यतः स्टॉक पुरस्कारांचा समावेश आहे. ते सर्वाधिक कमाई करणारे सीईओ आहेत.
HCL Technologies Ltd चे विजयकुमार यांचे $10.65 दशलक्ष (₹88 कोटी) इतके मानधन आहे, जे कंपनीच्या $12.58 अब्ज कमाईच्या 0.085% एवढे आहे.
Infosys CEO आणि MD सलील पारेख यांचे मानधन $6.8 दशलक्ष (₹56.4 कोटी)आहे. हे कंपनीच्या $18.1 अब्ज कमाईच्या 0.037% इतके आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे माजी CEO राजेश गोपीनाथन यांनी $3.5 दशलक्ष (29.16 कोटी)-
कंपनीच्या $27.9 अब्ज कमाईच्या 0.012% इतके कमावले आहे.
हे सर्वाधिक पगार कमावणारे सीईओज भारताच्या आयटी क्षेत्राची भरभराट करत जागतिक पातळीव आपले महत्त्वाचे स्थान निर्माण करत आहेत.