Anushka Tapshalkar
भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. भाषा आपली संस्कृती, ओळख दर्शवते. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिकसच्या अहवालानुसार पुढील भाषा जगात सर्वाधिक बोलल्या जातात.
जगात सर्वात जास्त प्रमाणात बोलली जाणारी ही भाषा आहे, जी व्यवसाय, विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संप्रेषणामध्ये जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. प्रसारमाध्यमे, तंत्रज्ञान आणि शिक्षणामध्ये त्याचा व्यापक वापर जगभरातील प्रसिद्धीमध्ये योगदान देतो.
चीन हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे, त्यामुळे ही जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. व्यवसाय आणि संस्कृतीत, प्रामुख्याने पूर्व आशियात ही भाषा महत्त्वाची भूमिका बजावते.
हिंदी ही भारतात प्रामुख्याने बोलली जाणारी भाषा असून, ती देशातील अधिकृत भाषांपैकी एक आहे. भारतीय चित्रपट, साहित्य आणि माध्यमांमध्ये हिंदीचा प्रमुख वाटा असून, दक्षिण आशियाई संस्कृती आणि संवादावर तिचा मोठा प्रभाव आहे.
ही लॅटिन अमेरिका, स्पेन आणि युनायटेड स्टेट्ससह अनेक देशांमध्ये व्यापक प्रमाणावर बोलली जाणारी भाषा आहे. जगभरातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून ती ओळखली जाते. समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा स्पॅनिशला जागतिक पातळीवर एक महत्त्वाची भाषा बनवतो.
फ्रेंच भाषा युरोप, आफ्रिका आणि अमेरिकेतील अनेक देशांमध्ये बोलली जाते, ज्यामुळे ती एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय भाषा ठरते. संस्कृतीवर या भाषेचा मोठा प्रभाव असून, ती कला आणि फॅशनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
अरबी मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेमध्ये बोलली जाते आणि तिच्या अनेक बोली आहेत. परंतु आधुनिक स्टॅंडर्ड अरबी भाषा आंतरराष्ट्रीय संवादासाठी एक सर्वसामान्य माढा म्हणून बवापरली जाते.
ही बांगलादेशची प्रमुख भाषा आहे तसेच भारतातील अनेक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. बंगाली भाषेला समृद्ध साहित्यिक परंपरा आहे. तसेच बंगाली लोकांच्या अस्मिता आणि लोक संस्कृतीमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावते.
रशिया आणि अनेक माजी सोव्हिएत राज्यांची अधिकृत भाषा असलेली ही भाषा युरोपमध्येही मोठ्या प्रमाणात बोलली जाते. ही विज्ञान आणि साहित्यामधील एक महत्त्वाची भाषा आहे.
ब्राझील, पोर्तुगाल आणि आफ्रिकेच्या काही भागांसह अनेक देशात ही भाषा बोलली जाते. वसाहतवादी इतिहास असल्यामुळे प्रसार झालेली ही भाषा आंतरराष्ट्रीय भाषा बनली आहे.
मलय भाषेचे प्रमाणित रूप असलेली ही भाषा इंडोनेशियाची अधिकृत भाषा आहे. शिक्षण, सरकार आणि माध्यमांमध्ये ही भाषा मोठया प्रमाणात वापरली जाते.