Anushka Tapshalkar
कोणत्याही त्रासाशिवाय दररोज एकदा किंवा दोनदा शौचास जाणे, हे चांगल्या पचनाचे लक्षण आहे.
जेवणानंतर फारसा पोट फुगण्याचा किंवा गॅस न होणो हे पचन सुरळीत असल्याचे लक्षण आहे.
भूक न लागणे किंवा खूप जास्त भूक लागणे असे न होता संतुलित भूक असणे पचन संस्थेचे चांगले आरोग्य दर्शवते.
चांगले पचन विषारी घटक बाहेर टाकते, त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसते.
योग्य पचनामुळे पोषणतत्त्वे शरीरात नीट शोषली जातात, ज्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
पचनतंत्र चांगले असल्यास अम्लपित्त आणि पोटात जळजळ होण्याचा त्रास टळतो.
चांगले पचन पोषणतत्त्वांची योग्य प्रक्रिया करून संतुलित आणि स्थिर वजन राखण्यास मदत करते.
अनेक प्रकारचे अन्न कोणत्याही त्रासाशिवाय खाऊ शकणे, जसे की पोटदुखी किंवा ढेकर, हे चांगल्या पचनाचे चिन्ह आहे.
चांगले पचन तंत्र आणि मजबूत प्रतिकारशक्ती आजारांमधून लवकर सावरण्यास मदत करतात.
(सकाळचा दुर्गंधी वगळता) कायमस्वरूपी ताजा श्वास असणे, हे पोटातील हानिकारक जिवाणूंचा अभाव असल्याचे लक्षण आहे.