आरोग्यासोबतच त्वचेसाठी फायदेशीर आहे मक्याचे पीठ, बनवा 'हा' फेसपॅक

Monika Lonkar –Kumbhar

मका

मका खायला सगळ्यांनाच आवडतो. मक्याचे कणीस, मक्यापासून बनवले जाणारे विविध खाद्यपदार्थ हे सगळ्यांनाच खायला आवडतात.

Corn Flour Face Packs

मक्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटक देखील आढळून येतात. त्यामुळे, मका हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

Corn Flour Face Packs

मक्याचे पीठ

आरोग्यासोबतच मका हा आपल्या त्वचेसाठी देखील तितकाच फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला मक्याच्या पीठापासून (कॉर्नफ्लोअर) बनवल्या जाणाऱ्या काही सोप्या फेसपॅक्सबद्दल सांगणार आहोत. 

Corn Flour Face Packs

कॉर्नफ्लोअर-नारळाच्या दूधाचा फेसपॅक

डागविरहीत त्वचेसाठी आणि चमकदार चेहऱ्यासाठी हा फेसॅपक अतिशय फायदेशीर आहे. हा फेसपॅक बनवण्यासाठी एका भांड्यात ३-४ चमचे कॉर्नफ्लोअर घ्या. 

Corn Flour Face Packs

त्यात आता २ चमचे नारळाचे दूध मिसळा आणि चिमूटभर हळद मिक्स करा.

Corn Flour Face Packs

या मिश्रणाची पेस्ट बनवून आता चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. या फेसपॅकमुळे ब्लॅकहेड्स आणि डार्कसर्कलची समस्या देखील दूर होईल. 

Corn Flour Face Packs

अधिक चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून किमान २ वेळा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. तुमची त्वचा ही उजळेल आणि चेहऱ्याच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.

Corn Flour Face Packs

त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी असा करा काकडीचा वापर, बनवा हे फेसपॅक

Skin Care Tips | esakal