Saisimran Ghashi
अनेक लोक हे पदार्थ दररोज अन्नात वापरतात, त्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका हळूहळू वाढत जातो.
यकृत शरीरातील पचन, रोगप्रतिकारक शक्ती, विषारी घटकांची निर्मूलन अशा अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये मदत करते, म्हणून त्याचे आरोग्य राखणे गरजेचे आहे.
हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड प्रशिक्षित तज्ज्ञ डॉ. सेठी यांनी सांगितले की, हे तीन पदार्थ ते स्वतः पूर्णपणे टाळतात.
या तेलांमध्ये ओमेगा-६ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असतो. याचे जास्त प्रमाण यकृतात जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण करते.
हे १००% फळांचा रस असल्याचा दावा करतात, पण त्यात फायबर नसतो व फ्रुक्टोज भरपूर असतो. यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.
यामध्ये भरपूर प्रमाणात फ्रुक्टोज असतो, जो यकृतामध्ये चरबी साठवतो. त्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका खूप वाढतो.
वरील पदार्थांपासून दूर राहणे व संतुलित आहार घेणे हे फॅटी लिव्हर टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.