Anushka Tapshalkar
रात्री पुरेशी झोप न घेतल्यामुळे शरीराला आराम मिळत नाही आणि दिवसभर थकलेले आणि कमकुवत वाटू लागते.
जास्त कॉफी किंवा चहा प्यायल्यामुळे झोप कमी होऊ शकते आणि दिवसभर थकवा आणि ऊर्जा कमी होऊ शकते.
जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड, शरीराला कमकुवत करतात आणि त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते.
सोशल मीडियावर जास्त वेळ घालविल्यामुळे मानसिक थकवा आणि ताण वाढतो, ज्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होऊ शकते.
ब्रेक न घेता काम करत राहिल्यामुळे बर्नआउट होऊ शकतो आणि यामुळे ऊर्जा कमी होऊ शकते.
दीर्घकाळ बसून राहिल्यामुळे मेटाबॉलिजम मंदावते आणि शरीराच्या ऊर्जा पातळीत घट होतो.
सतत चिंता आणि तणावामुळे शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनचे प्रमाण वाढते, जे थकवा आणि ऊर्जा कमी होण्यास कारणीभूत ठरते.
इतरांशी स्वतःची तुलना केल्यामुळे मानसिक दबाव वाढतो आणि या कारणामुळे आपली ऊर्जा कमी होऊ शकते.