Anushka Tapshalkar
मुलांंचा आत्मविश्वास, त्यांची विचार करण्याची पद्धती हे बऱ्याच अंशी आई-वडिलांच्या वागण्यावर अवलंबून असते. त्यामुळे पालकांनी या चूका कधीच करु नका.
सतत चुका दाखवून देणे किंवा दोष काढणे यामुळे मुलांना आपल्यात काही कमी आहे असे वाटते आणि नवीन गोष्टी करण्याची त्यांची इच्छा कमी होते. याऐवजी योग्य मार्गदर्शन जास्त उपतुक्त ठरेल.
मुलांना प्रत्येक गोष्टीपासून वाचवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना समस्यांशी सामना करायची सवय लागत नाही, ज्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. त्यांना स्वावलंबी होऊ द्या.
मुलांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवणे त्यांच्यावर अनावश्यक दबाव आणते आणि अपयशी झाल्यास ते स्वतःला कमी समजू लागतात. प्रगतीला महत्त्व द्या, परफेक्शनची अपेक्षा करू नका.
मुलांची त्यांच्या भावंडांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी तुलना केल्याने त्यांना न्यूनगंड निर्माण होतो. त्यांच्या वैयक्तिक कौशल्यांना प्रोत्साहन द्या.
मुलांचे विचार ऐकून न घेणे किंवा त्यांना नाकारल्याने त्यांना महत्त्व न मिळाल्यासारखे वाटते. त्यांच्या मतांचा आदर करा, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
मुलांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांचे कौतुक न करणे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करू शकते. लहान यशसुद्धा साजरे करून त्यांना प्रेरणा द्या.
"आळशी," "मूर्ख", "बधिर" अशा नकारात्मक शब्दांनी मुलांची स्वतःबद्दलची भावना कमी होते. सकारात्मक भाषा वापरून त्यांचा आत्मविश्वास वाढवा.