'या' 6 गोष्टी आरोग्यासाठी 'चमत्कारिक' ठरू शकतात!

Aarti Badade

कडू पदार्थ टाळू नका

अनेक लोक कडवट चवेमुळे अशा भाज्या किंवा फळे टाळतात, पण हे पदार्थ शरीरातील अवयव बरे करण्यात आणि पचन सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

bitter foods health benefits | Sakal

दुधी भाजी – पचनासाठी वरदान

दुधी थोडीशी कडवट वाटत असली तरी ती शरीराला थंडावा देते, पाण्याचे प्रमाण वाढवते आणि आम्लपित्ताची समस्या कमी करते.

bitter foods health benefits | Sakal

कारलं – साखरेवर नियंत्रण ठेवणारी भाजी

कारलं ही सर्वात प्रसिद्ध कडू भाजी असून ती रक्तातील साखर नियंत्रित करते, शरीरातील जळजळ कमी करते आणि पचन सुधारते.

bitter foods health benefits | Sakal

मेथी दाणे – वजन कमी करण्यासाठी उपयोगी

मेथीचे दाणे थोडेसे कडवट असले तरी ते फायबरने भरलेले असतात. ते रक्त शुद्ध करतात, अपचन कमी करतात आणि ऊर्जा वाढवतात.

bitter foods health benefits | Sakal

कडुलिंब – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी वनस्पती

कडुलिंबाची पाने अत्यंत कडू असली तरी ती रक्तशुद्धीकरक आहेत, त्वचेचे विकार दूर करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती बळकट करतात.

bitter foods health benefits | Sakal

कच्ची हळद – शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते

हळदीच्या मुळात दाह कमी करणारे घटक असतात. ती यकृतासाठी लाभदायक असून शरीरात साचलेली विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करते.

bitter foods health benefits | Sakal

आवळा – यकृत आणि पचनासाठी उत्तम

आवळा आंबट-कडू असून तो व्हिटॅमिन C चा चांगला स्रोत आहे. तो यकृताची कार्यक्षमता सुधारतो आणि पाचनसंस्थेला बळकट करतो.

bitter foods health benefits | Sakal

कडू पण उपयुक्त

ही सर्व कडू पदार्थ चवीनं जरी कठीण वाटली तरी त्यांचा दररोज आहारात समावेश केल्यास तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील.

bitter foods health benefits | Sakal

दररोज फक्त 10 ग्रॅम खा 'ही' पावडर, हाडं होतील मजबूत!

homemade bone remedy | Sakal
येथे क्लिक करा