Saisimran Ghashi
पालकांनी मुलांसमोर बोलताना आणि त्यांना शिकवताना विचारपूर्वक आणि संवेदनशील असणे खूप महत्त्वाचे आहे.
काही गोष्टी अशा आहेत ज्या मुलांच्या मानसिकतेवर दीर्घकालीन परिणाम करू शकतात.
मुलांच्या स्वप्नांबद्दल किंवा त्याच्या क्षमतेबद्दल असा नकारात्मक दृष्टिकोन पालकांनी कधीच ठेवू नका. हे मुलाच्या आत्मविश्वासाला धक्का पोहोचेल.
मुलांच्या व्यक्तिमत्वावर कधीही अशी टीका करू नका. मुलं स्वत:ला समजून घेत असतात, आणि अशी टीका त्यांच्या भावनिक आणि मानसिक विकासावर परिणाम करू शकते.
यामुळे मुलांना दोषी वाटू शकते आणि ते खूपच भावनिक होऊ शकतात. त्याऐवजी योग्य मार्गदर्शन देणे आणि समाधानकारक संवाद साधणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
मुलांना कधीच चुकीच्या गोष्टीवर पाठीशी घालू नका. त्यांच्या सकारात्मक पद्धतीने चुका समजून सांगा.
पालकांनी मुलांसमोर भांडणे करू नयेत. यामुळे त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो.
मुलांना प्रोत्साहन देणे, त्यांची क्षमता ओळखून त्यांना साथ देणे आणि सकारात्मक संवाद साधणे त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यास मदत करेल.