Saisimran Ghashi
उन्हाळा सुरू झाला आहे आणि मार्केटमध्ये कलिंगड (टरबूज) यायला सुरूवात झाली आहे.
कलिंगड (टरबूज) एक पौष्टिक आणि पाण्याने भरलेले फळ आहे. परंतु काही लोकांनी ते खाणे टाळावे किंवा मर्यादित प्रमाणात खावे.
कलिंगड खाणे कुणी टाळावे हे जाणून घेणे तुमच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे.
डायबिटिस असलेल्यांनी कलिंगड अजिबात खावू नये. ते खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते.
किडनीची समस्या असलेल्या लोकांनी कलिंगड खाणे टाळावे. जास्त पोटॅशियममुळे ते हानिकारक ठरू शकते.
हायपरकलेमिया असलेल्यांनी कलिंगड खावू नये. खाल्ल्यास शरीरातील पोटॅशियम वाढू शकते.
सर्दी-खोकला किंवा सायनस असलेल्यांनी कलिंगड टाळावे. हे थंड असल्याने त्रास वाढू शकतो.
पचनसंस्थेच्या समस्या असलेल्यांनी संवेदनशील पचनसंस्था असलेल्या लोकांनी कलिंगड कमी प्रमाणात खावे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.