Yashwant Kshirsagar
मानसशास्त्रानुसार व्यक्ती जे काही करतो ते त्याच्या व्यवहारातून किंवा शारीरिक हालचालीमध्ये प्रतित होते.
असं म्हटलं जातं की, माणूस खोटं बोलू शकतो पण त्याचे डोळे नाही. आपली बॉडी लॅंग्वेज कधीही खोटे बोलत नाही.
माणूस थापा मारताना खोटे बोलू शकतो पण त्याची बॉडी लॅंग्वेज सहजपणे बदलू शकत नाही.
पण तुम्हाला माहिती आहे का? बॉडी लॅंग्वेज किंवा शरीरातील अवयवावरुन देखील खरं आणि खोट्याचा तपास लावला जाऊ शकतो.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर एखादा व्यक्ती खोटे बोलत असेल तर त्यावेळी त्याचे नाक किंवा नाकाजवळचा भाग गरम होतो.
याशिवाय खोटे बोलताना कानदेखील गरम होतात. खरं तर हे वैज्ञानिकदृष्ट्या खरे नाही, पण बऱ्याच लोकांचे हे मत आहे की, खोटे बोलताना असे होते.
विज्ञानानुसार, खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात आणि नजरेत नजर घालून बोलू शकत नाही.
माणूस खोटे बोलताना योग्य पद्धतीने बोलू शकत नाही, किंवा जास्त वेगाने बोलू लागतो, किंवा नजरेत नजर न मिळवता बोलतो.