Pranali Kodre
रत्नागिरीला पर्यटनासाठी जात असाल, तर एक अनेकांसाठी आकर्षणाचे ठिकाण म्हणजे थिबा पॅलेस. हा पॅलेस वास्तुशिल्पाचा अप्रतिम नमुना आहे.
Thiba Palace, Ratnagiri
X/maha_tourism
ब्रम्हदेशाचा (आत्ताचे म्यानमार) राजा थिबा याला १८८५ मध्ये ब्रिटिशांनी कैद करून रत्नागिरीला आणले होते. त्यानंतर त्याला जेल रोड, फगरवठार या परिसरातील हवेलीमध्येही ठेवले होते.
King Thibaw Min
Sakal
१९१० मध्ये सध्या आकाशवाणी केंद्रानजीक एक नवीन पॅलेस बांधून या राजाला नजरकैदेत ठेवण्यात आले. तो त्याच्या राणीसह १९१६ पर्यंत येथे होता. त्यामुळे आता हा पॅलेस त्याच्याच नावाने ओळखला जातो.
Thiba Palace, Ratnagiri
X/maha_tourism
हा पॅलेस रत्नागिरीच्या स्थानिक जांभळ्या दगडात बांधलेला असून त्यावर ब्राम्ही कलाकृतीची छाप दिसते. तसेच फर्निचर तेव्हाच्या ब्रम्हदेशातून मागवलेल्या सागवानापासून बनविले आहे.
Thiba Palace, Ratnagiri
X/maha_tourism
१९९८ मध्ये राज्य शासनाने पुरातत्व खात्यामार्फत येथे वस्तुसंग्रहालय तयार केले असून कोकणातील दुर्मीळ आणि इतिहासकालिन वस्तू येथे पाहायला मिळतात.
Thiba Palace, Ratnagiri
X/maha_tourism
येथे थिबा राजाचे दालन, शिल्प दालन, पुरातन वस्तूंचे दालन आणि छायाचित्रे अशी चार दालने आहेत. १० व्या शतकापासून २१ व्या शतकापर्यंतच्या वस्तू येथे जतन केल्या आहेत.
Thiba Palace, Ratnagiri
थिबा राजाने अत्यंत सुरेख ठेवलेल्या या पॅलेसच्या संग्रहलायात सहाव्या शतकातील पुतळेही पाहायला मिळतात.
Thiba Palace, Ratnagiri
Sakal
पॅलेसला भेट देण्यासाठी सप्टेंबर ते मे हा उत्तम कालावधी आहे. पावसाळ्यात खूप पाऊस असल्याने पर्यटनाचा येथे आनंद घेता येत नाही. २४ ते २६ जानेवारीदरम्यान थिबा कला संगीत महोत्सवाचेही आयोजन केले जाते.
Thiba Palace, Ratnagiri
X/maha_tourism
थिबा पॅलेसला जाण्यासाठी जवळचे रेल्वेस्थानक आणि बसस्थानक रत्नागिरी आहे. तसेच खासगी वाहनानेही येथे जाता येते.
Ratnagiri
Sakal
Velas Beach, Ratnagiri
Sakal