Pranali Kodre
रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यात वेळास गाव कासवांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. या गावाला सुंदर समुद्रकिनारही लाभला आहे, जो पर्यटकांसाठी आकर्षणही ठरतो.
Velas Beach, Ratnagiri
X/maha_tourism
वेळास हे अस्सल कोकणी बाजाचे गाव असून जे नारळी आणि पोफळी झाडांनी नटलेलं आहे, तीन बाजूंनी डोंगरांनी वेढले असून ४ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे.
Velas Beach, Ratnagiri
ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या संवर्धन मोहिम राबवण्यासाठी हे गाव ओळखले जाते. कासव विणीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पर्यटकांची इथे गर्दी होते.
Velas Beach, Ratnagiri
X/PIBBhubaneswar
वेळास येथे पर्यटनासाठी नोव्हेंबर ते मे हा कालावधी उत्तम आहे. मार्च ते मे महिन्यात होणारा कासवांचा जन्मसोहळा पाहण्यासारखा असतो. चैत्र महिन्यात येथे दुर्गादेवीचा तीन दिवसांचा उत्सवही होतो.
Velas Beach, Ratnagiri
X/maha_tourism
येथे समुद्रकिनाऱ्यावर थंडीच्या कालावधीत सीगल पक्ष्यांचेही दर्शन होते. व्हेल माशांचेही येथे अस्तित्व दिसते.
Velas Beach, Ratnagiri
X/maha_tourism
उन्हाळ्यात आंबे, फणस काजू, नारळ, केळी व बागायती फळांचा स्वादही येथे घेता येतो. नारळापासून निघणाऱ्या माडीचीही चव घेता येते.
Velas Beach, Ratnagiri
Sakal
येथे जंगली श्वापदे, दुर्मीळ जीव, पक्षी निरीक्षण आणि सुक्ष्म जीवांचा आभ्यास करण्याचीही संधी येथे मिळते.
Velas Beach, Ratnagiri
X/maha_tourism
वेळासला जाण्यासाठी पुरेशी वाहन व्यवस्था आहे. येथे जाण्यासाठी जवळचे रेल्वेस्टेशन रत्नागिरी असून जवळचे बसस्थानक मंडणगड आहे.
Ratnagiri
Sakal
Achara Beach, Malvan
Sakal