मान, पाठदुखी टाळायची असेल तर उशी वापरण्याची ‘ही’ योग्य पद्धत जाणून घ्या

Aarti Badade

खूप मऊ किंवा कडक उशी टाळा

अति मऊ किंवा कडक उशीमुळे मान आणि पाठीच्या कण्याचा समतोल बिघडतो.त्यामुळे पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी होऊ शकतात.

choose the right pillow for healthy sleep | Sakal

पाठीचा कणा आणि मान

कणा लांबलचक आणि लवचिक असतो, तो मानेशी सरळ रेषेत (aligned) असावा लागतो. यामुळे संपूर्ण शरीरावर ताण न बसता योग्य पोस्चर टिकून राहते.

choose the right pillow for healthy sleep | Sakal

डोक्याला योग्य कोन हवा

चुकीच्या उशीमुळे डोकं उंचावते आणि मेंदूकडे रक्तप्रवाह कमी होतो.यामुळे सकाळी डोकं दुखणं, गरगर होणं किंवा जड वाटणं असा त्रास होऊ शकतो.

choose the right pillow for healthy sleep | Sakal

श्वसनावर परिणाम होतो

चुकीची उशी श्वसनप्रवाहात अडथळा आणू शकते.त्यामुळे शरीराचा नैसर्गिक फ्लो (Optimal Flow) बिघडतो.

choose the right pillow for healthy sleep | Sakal

झोपण्याची पद्धत महत्त्वाची

झोपण्याची पोझिशन, गादी आणि उशी – हे सगळं एकत्र योग्य असणं गरजेचं.मान आणि कणा एका सरळ रेषेत असले पाहिजेत.

choose the right pillow for healthy sleep | Sakal

उशी न वापरणं फायदेशीर?

उशी न वापरता झोपल्यास कदाचित त्रास कमी होईल.पण जर मान आणि कणा अलाइन नसतील, तरीही त्रास होऊ शकतो.

choose the right pillow for healthy sleep | Sakal

उपाय काय

उशी वापरायचीच असेल, तर ती ना खूप मऊ, ना खूप कडक असावी.लहान उशी किंवा हलकी घडी केलेली चादर वापरूनही योग्य समतोल साधता येतो.

choose the right pillow for healthy sleep | Sakal

उशी वापरणं

उशी वापरणं चूक नाही, पण ती योग्य प्रकारे आणि आपल्या शरीराच्या रचनेनुसार वापरणं गरजेचं आहे. झोपताना ‘कणा आणि मान’ समरेषीय असणं गरजेच आहे.

choose the right pillow for healthy sleep | Sakal

करंगळीची लांबी सांगते तुमचे भाग्य! जाणून घ्या तुमचं भविष्य

palmistry finger length | Sakal
येथे क्लिक करा