कलर केलेल्या केसांवर 'या' गोष्टींचा वापर करणे टाळा, केस होऊ शकतात खराब

Monika Lonkar –Kumbhar

हेअरस्टाईल

आजकाल केसांची खास स्टाईल करण्यासाठी विविध प्रॉडक्ट्स बाजारात येत आहेत. प्रॉडक्ट्स अन् हेअर स्टायलिंग टूल्सचा वापर महिलांकडून मोठ्या प्रमाणात केला जातोय.

हेअर कलरिंग

आजकाल हेअर कलरिंगची फार मोठी क्रेझ महिलांमध्ये दिसून येतेय. हेअर कलर केल्यामुळे, केसांचा एकूणच लूक बदलतो. 

कलर केलेल्या केसांची तितकीच काळजी देखील घ्यावी लागते. परंतु, रंगीत केसांवर कोणतेही उत्पादन किंवा घरगुती उपाय लागू करण्यापूर्वी काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.

लिंबाचा रस

केस चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून केसांना लिंबाचा रस लावला जातो. 

लिंबाचा रस कलर केलेल्या केसांना लावल्यामुळे केसांचा रंग कालांतराने निघून जाऊ शकतो. शिवाय, केस कमजोर होऊ शकतात.

बेकिंग सोडा

तुमच्या रंगीत केसांवर बेकिंग सोड्याचा वापर करणे टाळा. बेकिंग सोड्यामध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे, रंगीत केसांना हानी पोहचू शकते. 

मेहंदी

मेहंदी ही केसांसाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. परंतु, कलर केलेल्या केसांवर मेहंदीचा वापर करणे चुकीचे आहे. यामुळे, केस खराब देखील होऊ शकतात.

सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती?

Eating Apple | esakal