एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशांना पाहू शकतो 'हा' प्राणी

Aarti Badade

सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वर्गातील

प्राणी जगतात आपल्या शरीराचा रंग बदलण्याच्या आणि झाडांवर हुशारीने वावरण्याच्या अद्भूत क्षमतेसाठी सरडा 'गिरगिट' (Chameleon) हा जीव जगभर ओळखला जातो.

Chameleons Sarda Move Their Eyes

|

Sakal

बदलतो रंग

सरडा केवळ शत्रूपासून लपण्यासाठीच नव्हे, तर वातावरणातील तापमान, आजूबाजूचा प्रकाश आणि स्वतःच्या भावनांनुसार (मूड) क्षणार्धात आपला रंग बदलतात.

Chameleons Sarda Move Their Eyes

|

Sakal

पेशींमुळे त्वचेवर उमटतात रंगीबेरंगी छटा

सारड्याच्या त्वचेमध्ये विशेष प्रकारच्या रंगद्रव्य पेशी असतात, ज्यांच्या मदतीने ते गरजेनुसार स्वतःला हिरवा, पिवळा, काळा किंवा तपकिरी रंगात सहज बदलू शकतात.

Chameleons Sarda Move Their Eyes

|

Sakal

अतिशय चिकट जीभ

सारड्याची जीभ त्यांच्या एकूण शरीराच्या लांबीपेक्षाही जास्त लांब असू शकते, जी अत्यंत वेगाने बाहेर पडून तिच्या टोकाकडील चिकट द्रव्याने कीटकांना एका क्षणात पकडते.

Chameleons Sarda Move Their Eyes

|

Sakal

दोन्ही डोळ्यांची हालचाल

त्यांचे डोळे स्वतंत्रपणे वेगवेगळ्या दिशेला फिरू शकतात, ज्यामुळे ते एकाच वेळी एका डोळ्याने शिकार शोधू शकतात आणि दुसऱ्या डोळ्याने स्वतःच्या संरक्षणासाठी लक्ष ठेवतात.

Chameleons Sarda Move Their Eyes

|

Sakal

पायांची विशेष रचना

त्यांच्या पायांची रचना (Zygodactylous) निसर्गाने अशी केली आहे की, दोन बोटे पुढे आणि दोन मागे असतात; ज्यामुळे त्यांना झाडांच्या फांद्यांवर घट्ट पकड मिळवणे सोपे जाते.

Chameleons Sarda Move Their Eyes

|

Sakal

मुख्य अन्न

निसर्गाचा समतोल राखणारा हा वैशिष्ट्यपूर्ण जीव आपल्या जीवनक्रमात मुख्यत्वे लहान-मोठे कीटक, टोळ, लहान सरडे आणि काही वेळा लहान पक्षी खाऊन आपले पोट भरतो.

Chameleons Sarda Move Their Eyes

|

Sakal

सिंधुदुर्गातील १७ व्या शतकातील ‘हा’ समुद्र किल्ला पाहिलात का? मराठ्यांच्या शौर्याची जिवंत साक्ष!

Devgad Fort Sindhudurg Tourism

|

Sakal

येथे क्लिक करा