'या' देशात चक्क दाढी वाढवली तर भरावा लागायचा टॅक्स; चूक केली तर...

Anushka Tapshalkar

आज स्टाईल, कधीकाळी गुन्हा

आज दाढी ठेवणं फॅशन मानलं जातं; पण कधीकाळी दाढी वाढवण्यासाठी कर भरावा लागत होता, नाहीतर शिक्षा निश्चित होती.

Growing Beard Once a Crime

|

sakal

1698 मधील अजब नियम

रशियात पिटर द ग्रेटच्या काळात, 1698 साली दाढीवर अधिकृतपणे ‘Beard Tax’ लागू करण्यात आला.

Beard Tax

|

sakal

मागासलेपणाचं प्रतीक समजली जायची दाढी

पिटर द ग्रेटला दाढी ही पारंपरिकता आणि मागासलेपणाचं प्रतीक वाटायची; म्हणूनच त्याने हा कठोर नियम आणला.

Symbol of Backwardness in Society

|

sakal

युरोप दौऱ्यानंतर निर्णय

इंग्लंड, नेदरलँड, फ्रान्ससारख्या देशांतील पुरुषांची आधुनिक जीवनशैली पाहून पिटर द ग्रेटने रशियात दाढीवर कर लावला.

Decision After Peter the Great's Europe Tour

|

sakal

दाढीसाठी टोकन बंधनकारक

कर भरल्यानंतर पुरुषांना चांदी किंवा तांब्याचं टोकन दिलं जायचं; हे टोकन नेहमी सोबत ठेवणं आवश्यक होतं.

Token Mandatory for Beard

|

sakal

टोकनवर धक्कादायक वाक्य

या टोकनवर ‘दाढी म्हणजे निरर्थक ओझं आहे’ असं स्पष्टपणे कोरलेलं असायचं.

Shocking Sentence on the Token

|

sakal

कर नाही तर सार्वजनिक अपमान

टोकन नसेल तर पोलिस रस्त्यातच पकडून सार्वजनिकरित्या दाढी काढायचे; जमा झालेला कर विकासकामं आणि सैन्यासाठी वापरला जायचा.

Public Humiliation if by Police

|

sakal

Konkan: दापोलीतील 'आंजर्ले' - गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीतील गाव

Anjarle, Dapoli Tourism

|

Sakal

आणखी वाचा