Anuradha Vipat
‘मिस इंडिया’चा किताब जिंकून अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली.
आज प्रियांका हॉलीवूडमध्ये तिच्या करिअरला पुढे घेऊन जात आहे.
प्रियांकाला इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे
मिस इंडियाच्या स्पर्धेत भाग घेताना प्रियांकाचे स्वर्गीय वडील अशोक चोप्रा यांची परवानगी घेणे फार कठीण होते.
प्रियांका त्यावेळी इयत्ता बारावीमध्ये शिकत होती, तिची बोर्डाची परीक्षा होती, त्यामुळे तिच्या वडिलांचा होकार मिळवणे हे तिच्यासाठी फार कठीण होते.
जेव्हा प्रियांकाने तिला ‘मिस इंडिया’मध्ये भाग घ्यायचा आहे असं सांगितले त्यावेळी वडील अशोक चोप्रा म्हणाले की, सध्या बोर्डाचे वर्ष आहे आणि हे सोपे नाही. तिला जास्त अभ्यास करू द्या. या सर्व गोष्टींमुळे अभ्यासातून लक्ष विचलित होते.
‘मिस इंडिया’मध्ये भाग घेण्याआधी प्रियांकाच्या काकांनीही विरोध केला होता