'हे' राजे होते औरंगजेबपेक्षाही क्रूर; त्यांनी आपल्याच लोकांना निर्दयीपणे ठार मारले!

सकाळ डिजिटल टीम

औरंगजेब क्रूर शासक

इतिहासात औरंगजेबकडं (Aurangzeb) क्रूर शासक म्हणून पाहिलं जातं, परंतु अनेक राजे त्याच्यापेक्षाही क्रूर होते.

Cruel Kings

स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांची केली हत्या

जगात असे अनेक राज्यकर्ते झाले आहेत, ज्यांनी आपले राज्य वाचवण्यासाठी स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या केलीये. चला अशा काही राजांबद्दल जाणून घेऊ..

Cruel Kings

चंगेज खान

जगातील सर्वात क्रूर शासकांपैकी एक असलेल्या चंगेज खानने (Genghis Khan) स्वतःच्या जावयाची हत्या केली होती. त्याने चंगेज खानविरुद्ध बंड करायला सुरुवात केली होती. त्यामुळे चंगेजने फक्त जावयाचीच नव्हे, तर त्याच्या संपूर्ण टोळीचीही हत्या केली.

Cruel Kings

चीनचा योंगले सम्राट झू दी

चीनचा योंगले सम्राट झू दी (Zhu Di) याने सत्ता मिळवण्यासाठी त्याचा स्वतःचा पुतण्या सम्राट जियानवेन याला जिवंत जाळलं होतं. योंगले सम्राटाच्या कारकिर्दीत हजारो लोकांना छळून ठार मारण्यात आले होते.

Cruel Kings

तुर्की सुलतान महमद तिसरा

तुर्की सुलतान महमद तिसरा (Turkish Sultan Mehmed III) गादीवर येताच त्याने त्याचे 19 भाऊ आणि अनेक पुतण्यांना ठार मारले. कोणीही सिंहासनाला आव्हान देऊ नये, म्हणून भावांना मारण्याची परंपरा ऑटोमन साम्राज्यात बनली होती.

Cruel Kings

रशियाचा राजा इव्हान चौथा

1581 मध्ये रशियाचा राजा इव्हान चौथा (Tsar Ivan IV of Russia) याने रागाच्या भरात स्वतःचा मुलगा आणि वारस इव्हान इव्हानोविचची हत्या केली. इव्हानने आपल्या मुलाच्या डोक्यावर राजदंड इतका जोरात मारला, की जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

Cruel Kings

रोमन सम्राट कॅराकल्ला

रोमन सम्राट कॅराकल्लाने (Roman Emperor Caracalla) इसवी सन 211 मध्ये त्याचा भाऊ गेटा याची हत्या केली. त्याने त्याच्या भावाच्या सर्व समर्थकांनाही मारले. एवढेच नाही तर कॅराकल्लाने गेटाचे फोटो आणि त्याचे अस्तित्व मिटवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.

Cruel Kings

सह्याद्रीच्या घनदाट जंगलात दडलेला 'हा' एकमेव किल्ला औरंगजेबला कधीच सापडला नाही!

Vasota Fort History | esakal
येथे क्लिक करा