Aarti Badade
जिऱ्याचा चहा चयापचय वाढवतो आणि अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत करतो. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त.
जिऱ्यात फायबर भरपूर असल्याने पचन सुधारते आणि पोट बराच वेळ भरलेले राहते.
जिऱ्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी घटक असतात जे शरीरातील सूज व दाह कमी करतात.
दररोज एक कप जिऱ्याचा चहा पिल्याने शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होतो. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर.
जिऱ्याचा चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. तो रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो.
जिऱ्यातील संयुगे भूक कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे ओव्हरइटिंगपासून बचाव होतो
जिऱ्याचा चहा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो आणि शरीर शुद्ध ठेवतो.
जिऱ्याचा चहा सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणापूर्वी घेतल्यास अधिक फायदेशीर ठरतो.